Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

केज (बीड): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती, तर त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान सदर आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर केल्यानंतर तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालायने दिली आहे.

दरम्यान आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून केज न्यायालयात करण्यात आली. अटक केलेले हे सर्वजण टोळीने गुन्हे करणारे आरोपी आहेत. संघटित गुन्हे तसेच दहशत निर्माण करणे आणि जिल्ह्यात नवीन व्यवसाय करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. तीनही आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. सरपंच संतोष देशमुख यांचा खून सर्वांनी एंजॉय केला आहे. त्यामुळे आता या आरोपींना आळा घालणे गरजेचे आहे. तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकिलांकडून कोर्टात करण्यात आला.

तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटी टीमकडे आवश्यक असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत. सदर गुन्ह्यांमध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटेला देखील यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. डिजिटल एव्हिडन्स मिळाले आहेत, असे पोलीस म्हणत आहेत. तसेच आरोपींना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही, असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडली दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!