Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Crime : तारा चोरीचा थरार उलटला जीवावर; टॉवर कोसळून दोघांचा मृत्यू, अपघाताचा बनावही फसला

Beed Crime : तारा चोरीचा थरार उलटला जीवावर; टॉवर कोसळून दोघांचा मृत्यू, अपघाताचा बनावही फसला

Beed Crime : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हायव्होल्टेज विद्युत तार चोरी करताना भीषण दुर्घटना घडली. टॉवरवर चढून तारा कापण्याचा प्रयत्न करत असताना संपूर्ण टॉवरच कोसळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर साथीदारांनी अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस तपासात सत्य उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून आलेल्या पाच जणांच्या टोळीने केज तालुक्यातील नांदूर घाट परिसर गाठला होता. शनिवारी रात्री त्यांनी हायव्होल्टेज टॉवरवर चढून तार कापण्यास सुरुवात केली. याच दरम्यान टॉवर अचानक कोसळला. या दुर्घटनेत अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोघांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर घाबरलेल्या इतर तिघांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन्ही मृतदेह कारमध्ये टाकून परभणीकडे नेले आणि तेथे गाडीतच सोडून पसार झाले.

मात्र, रुग्णालयात मृतदेह दाखल करताना संशय निर्माण झाला. नातेवाईकांच्या चौकशीनंतर आणि पोलिसांच्या तपासातून संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सध्या या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे बीड आणि परभणी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!