Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मध्यरात्री गोळीबाराचा थरार! घरातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; परिसरात खळबळ

मध्यरात्री गोळीबाराचा थरार! घरातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; परिसरात खळबळ

Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एन-६ सिडकोतील साईनगर भागात ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाने राहत्या घरातच स्वतःवर गोळी झाडल्याची घटना घडली. गोळी कानाजवळून डोक्याच्या आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेच्या वेळी समीर घरी एकटाच होता. आई कामानिमित्त बाहेर गेली होती. काही वेळाने लहान भाऊ घरी परतला असता समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनास्थळी पिस्तूलही सापडले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सिडको पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शहरात आणखी एका घटनेत सोमपुरी भागात किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले असून काहींना डोक्यावर जबर मार लागला आहे. दोन्ही घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!