Solapur Sucide News : सोलापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ४७ वर्षीय अनिल मारुती नरवडे यांनी रेल्वे पुलावरून उडी मारत जीवन संपवलं. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
आत्महत्येपूर्वी नरवडे यांनी आपल्या मुलाला व्हॉट्सअॅपवर भावनिक संदेश पाठवला. “मी तुझ्या लायकीचा वडील नाही, मला माफ कर,” असे लिहित त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या. तसेच मुलाला आई आणि भावाची जबाबदारी सांभाळण्याचं आवाहन करत, स्वतःच्या चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज फेडण्यासाठी त्यांनी स्वतःची दुचाकीही गहाण ठेवली होती. दारू आणि जुगाराच्या व्यसनामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. अखेर या सर्व तणावातून त्यांनी सोलापुरातील संभाजी महाराज तलाव परिसरातील रेल्वे पुलावरून उडी घेतली.
या घटनेमुळे नरवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


