Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Public Holiday List : पुढच्या वर्षी ९ लाँग वीकेंड्सची भन्नाट संधी! शाळा-ऑफिस-बँका कधी बंद? आताच डायरीत नोट करा

Public Holiday List : पुढच्या वर्षी ९ लाँग वीकेंड्सची भन्नाट संधी! शाळा-ऑफिस-बँका कधी बंद? आताच डायरीत नोट करा

2026 Maharashtra public holiday full list : नवं वर्ष २०२६ जवळ येतंय आणि महाराष्ट्र सरकारनं आधीच पुढच्या वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यंदा तब्बल ९ वेळा लाँग वीकेंड मिळणार असून काही सण-उत्सव थेट गुरुवार-शुक्रवारी येत आहेत. त्यामुळे ३ ते ४ दिवसांची सलग सुट्टी घेऊन फिरायला जायची संधी मिळणार आहे.

सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि बँकांना सुट्ट्या लागू आहेत. पुढच्या वर्षी मित्र अथवा कुटुंबासोबत किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत फिरण्याचा प्लॅन करायचा असेल तर आताच तारखा नोट करा अन् तिकिटे बुक करा.

२०२६ मध्ये मिळणारे खास लाँग वीकेंड्स आणि मोठ्या सुट्ट्या:

– १ मे (शुक्रवार) : महाराष्ट्र दिन + बुद्ध पौर्णिमा → ३ दिवस (शुक्र-शनि-रवि)
– २५ डिसेंबर (शुक्रवार) : ख्रिसमस → ३ दिवस (शुक्र-शनि-रवि)
– १९ फेब्रुवारी (गुरुवार) : शिवजयंती → रजा घेतली तर ४ दिवस
– १९ मार्च (गुरुवार) : गुढीपाडवा + २६ मार्च (गुरुवार) रामनवमी → दोन गुरुवारी, मध्ये रजा घेतली तर मोठी सुट्टी
– ३ एप्रिल (शुक्रवार) : गुड फ्रायडे → ३ दिवस
– दिवाळी काळ : ८ नोव्हेंबर (रविवार) अमावस्या, १० मंगळवार बलिप्रतिपदा, ११ बुधवार भाऊबीज → सोमवारी रजा घेतली तर ५ दिवसांची सुट्टी शक्य

महाराष्ट्र २०२६ ची अधिकृत सार्वजनिक सुट्ट्या यादी:

– २६ जानेवारी, सोमवार : प्रजासत्ताक दिन
– १५ फेब्रुवारी, रविवार : महाशिवरात्री
– १९ फेब्रुवारी, गुरुवार : छत्रपती शिवाजी महाराज जयंती
– ३ मार्च, मंगळवार : होळी (धुलिवंदन)
– १९ मार्च, गुरुवार : गुढीपाडवा
– २१ मार्च, शनिवार : रमजान ईद (ईद-उल-फितर)
– २६ मार्च, गुरुवार : रामनवमी
– ३१ मार्च, मंगळवार : महावीर जयंती
– ३ एप्रिल, शुक्रवार : गुड फ्रायडे
– १४ एप्रिल, मंगळवार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
– १ मे, शुक्रवार : महाराष्ट्र दिन & बुद्ध पौर्णिमा
– २८ मे, गुरुवार : बकरीद (ईद-उल-झुहा)
– २६ जून, शुक्रवार : मोहरम
– १५ ऑगस्ट, शनिवार : स्वातंत्र्य दिन & पारशी नववर्ष
– २६ ऑगस्ट, बुधवार : ईद-ए-मिलाद
– १४ सप्टेंबर, सोमवार : गणेश चतुर्थी
– २ ऑक्टोबर, शुक्रवार : महात्मा गांधी जयंती
– २० ऑक्टोबर, मंगळवार : दसरा (विजया दशमी)
– ८ नोव्हेंबर, रविवार : दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)
– १० नोव्हेंबर, मंगळवार : बलिप्रतिपदा
– ११ नोव्हेंबर, बुधवार : भाऊबीज
– २४ नोव्हेंबर, मंगळवार : गुरूनानक जयंती
– २५ डिसेंबर, शुक्रवार : ख्रिसमस

२०२६ मध्ये काही सुट्ट्या आठवड्याच्या शेवटी किंवा जवळ येत आहेत, त्यामुळे फिरण्याचा प्लान करण्यासाठी आताच तारखा नोट करून ठेवा अन् प्लॅन करा. उदाहरणार्थ, १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा दोन्ही शुक्रवारी आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार मिळून ३ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!