Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून २.२९ कोटींचा गांजा जप्त

पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून २.२९ कोटींचा गांजा जप्त

पुणे : बँकॉकहून पुण्यात दाखल झालेल्या एका प्रवाशाच्या चेक-इन बॅगेतून एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल २.२९ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. ही घटना ८ डिसेंबरला घडली असून, प्रवाशाला तात्काळ अटक करण्यात आली. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एआययूला गोपनीय टिप मिळाली होती. त्यानुसार, ८ डिसेंबरला इंडिगो फ्लाइट ६ई-१०९६ वरून बँकॉकहून आलेल्या एका पुरुष प्रवाशाला संशयित वाटल्याने चौकशीसाठी थांबवण्यात आले. त्याच्या चेक-इन बॅगेतून दोन एअरटाईट पिशव्यांमध्ये २,२९९.४४ ग्रॅम गांजा आढळला. हा गांजा उच्च दर्जाचा असून, काळ्या बाजारात त्याची किंमत २.२९ कोटी रुपये आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने उगवलेला हा गांजा सामान्य गांजापेक्षा अधिक शक्तिशाली असतो, ज्यामुळे त्याची मागणी ड्रग मार्केटमध्ये जास्त असते.

प्रवाशाची ओळख पटवण्यात आली असून, विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान, या तस्करीचे मूळ स्रोत आणि इतर सहभागींवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुणे कस्टम्सने सांगितले की, बँकॉक ते भारत असा हा रूट ड्रग तस्करीसाठी संवेदनशील आहे. यापूर्वीही पुणे विमानतळावर अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात मे महिन्यात १०.३ कोटींचा गांजा आणि ऑगस्टमध्ये ६.१ कोटींचा हायड्रोपोनिक वीड जप्त झाला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!