Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बदलापूर पुन्हा हादरले..! शाळेच्या व्हॅनमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नागरिकांमध्ये तीव्र संताप

बदलापूर पुन्हा हादरले..! शाळेच्या व्हॅनमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नागरिकांमध्ये तीव्र संताप

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम परिसरात पुन्हा एकदा संतापजनक घटना उघडकीस आली असून, शाळेतून घरी परतणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर चिमुकली स्कूल व्हॅनने घरी परतत होती. याच दरम्यान व्हॅन चालकाने तिच्यावर मारहाण करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत आरोपी व्हॅन चालकाला अटक केली आहे. पीडित चिमुकलीची वैद्यकीय तपासणी सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संतप्त पालक व नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काही राजकीय कार्यकर्त्यांनी संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही बदलापुरात अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होते. त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!