Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Zilla Parishad Election : महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार; ‘या’ तारखेला होणार मतदान

Zilla Parishad Election : महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार; ‘या’ तारखेला होणार मतदान

Zilla Parishad Election : राज्यात सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या 7 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढील महिन्यात म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी मतदान होऊ शकते.

राज्यातील एकूण 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र यापैकी 17 जिल्हा परिषद आणि 88 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांहून अधिक मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच निवडणुका घेण्याची तयारी आयोगाकडून सुरू आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये राज्यातील 29 जिल्ह्यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सध्या व्यस्त आहे. काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक महापालिका निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच जाहीर होणार आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना विलंब झाला. आता मात्र हा पेच काही अंशी सुटल्याने निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!