Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी..! राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार; राज्य निवडणूक आयोगाचे कडक निर्देश

मोठी बातमी..! राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार; राज्य निवडणूक आयोगाचे कडक निर्देश

Maharashtra Municipal Corporation Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत ६७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या सर्व बिनविरोध निवडींची कसून चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याचा तपास केला जाईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध विजयी उमेदवारांची विजय घोषणा थांबवण्यात आली आहे.

आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त आणि वॉर्ड ‘ए’ कार्यालयातील CCTV फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. कुलाबातील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल (एस) आणि आपचे उमेदवार दबावाखाली अर्ज न स्वीकारल्याचा आरोप आहे. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. २ जानेवारी नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील.

पक्षनिहाय बिनविरोध विजयी उमेदवार :
-भाजप : सर्वाधिक ४५ उमेदवार बिनविरोध (कल्याण-डोंबिवलीत १५)
-शिवसेना (शिंदे गट) : १९ उमेदवार (कल्याण-डोंबिवलीत ६)
-राष्ट्रवादी (अजित पवार गट) : २ उमेदवार
-इस्लाम पार्टी (मालेगाव) : १ उमेदवार

कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेला बिनविरोध यश मिळाले आहे. या चौकशीमुळे महायुतीसाठी धक्कादायक वळण आले आहे. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल असून, या प्रकरणाचा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या निर्देशांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!