Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai: पोलिसांनी रिक्षा थांबवल्याने संतप्त भीम अनुयायांचे रस्ता रोको आंदोलन; चुनाभट्टी-सायन मार्गावर तणाव

Mumbai: पोलिसांनी रिक्षा थांबवल्याने संतप्त भीम अनुयायांचे रस्ता रोको आंदोलन; चुनाभट्टी-सायन मार्गावर तणाव

Mumbai News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीकडे रवाना झालेल्या अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी-सायन कनेक्टरजवळ रोखून धरल्याने परिसरात गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. तुर्भे भागातून रिक्षांमधून मोठ्या संख्येने अनुयायी दादरकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना पुढे जाण्याची परवानगी नाकारली. अनुयायांनी आरोप केला की दरवर्षी आम्ही याच मार्गाने रिक्षातून येतो, परंतु यंदा अचानक अडवले जात आहे. आधी कळवले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. पोलिसांनी सांगितले की चुनाभट्टी-सायन कनेक्टरवर रिक्षा वाहतूक नियमांनुसार अनुमती नाही, त्यामुळे त्यांना थांबवण्यात आले.

रस्ता रोको, वाहतूक कोंडी

पोलिसांच्या कारवाईनंतर संतप्त अनुयायांनी पूर्व द्रुतगती महामार्गासह सायनजवळ रस्ता अडवला. त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी काही वाहनं थांबवली, यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद घडला. या तणावामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा – Indu Mill Smarak: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखचं सांगितली

इंदू मिल स्मारक

दरम्यान, दादरमधील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा वेग वाढला आहे. पुतळा संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर नव्या सरकारने नव्याने समन्वय समिती स्थापन केली असून, येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचे स्ट्रक्चर उभे करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. स्मारक समितीच्या माहितीनुसार, सर्व अडथळे दूर राहिल्यास पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!