Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dilip Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक, कुटुंबीय फरार

Dilip Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक, कुटुंबीय फरार

नवी मुंबई : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिलीप खेडकर यांचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याला धुळे येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून फरार असलेले दिलीप खेडकर आणि त्यांचा ड्रायव्हर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या तीन तपास पथकं कार्यरत आहेत.

काय आहे प्रकरण?

शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलुंड-ऐरोली रस्त्यावर लँड क्रूझर गाडी आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात अपघात झाला. अपघातानंतर गाडीतून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल्याचा आरोप आहे. ट्रक चालकाने मालक विलास ढेंगरे यांना ही घटना कळवली, आणि रबाळे पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली गेली.

तपासादरम्यान, पोलिसांना आढळले की ही लँड क्रूझर गाडी पुण्यातील बाणेर येथील एका बंगल्यासमोर उभी होती, जी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीची आहे. पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकला असता, दिलीप आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर फरार झाल्याचे समोर आले.

मोबाईल बंद, कुटुंबीय गायब

दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी त्यांचे मोबाईल पुण्यातील बंगल्यात ठेवून पळ काढला आहे. पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासले असता, दोघांचे शेवटचे लोकेशन बंगल्यातच आढळले. घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेण्यात आला, परंतु दिलीप आणि मनोरमा यांचे मोबाईल सापडले नाहीत. अपघातातील लँड क्रूझर वगळता खेडकर कुटुंबाच्या सर्व गाड्या बंगल्यातच आहेत. पोलिसांच्या मते, मनोरमा खेडकर कॅबमधून पळून गेल्या असाव्यात.

पोलिसांवर कुत्रे सोडले

पोलिसांनी खेडकर यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि घरातील कुत्रे पोलिसांवर सोडले, असा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. काही वेळाने प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, परंतु त्याचवेळी दिलीप खेडकर दुसऱ्या मार्गाने पळून गेल्याची माहिती आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!