मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या (दि. २४) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदरांसोबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ठाकरेंचे काही खासदर संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाचा आज (दि. २३) मेळावा होणार आहे. आजच्या शिंदे गटाच्या मेळाव्यात कोणताही मोठा पक्षप्रवेश होणार नाही. दरम्यान माजी खासदार राहुल शेवाळे यांनी २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकित यापूर्वी केले होते. परंतु, ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या शक्यतेमुळे शिंदे गटाने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचीही चर्चा आहे.


