Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही : अदिती तटकरेंची स्पष्टोक्ती

अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही : अदिती तटकरेंची स्पष्टोक्ती

मुंबई: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे राज्य सरकार परत घेणार असल्याची टीका विरोधक करत आहेत. अशातचआता महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत खुलासा केला आहे. अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही. पण अपात्र ठरलेल्या बहिणांना यापुढे या योजनेचा लाभ घेत येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

तसेच आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणांना त्यांचे कागदपत्र जाऊन मागितले नाहीत किंवा पडताळणीसाठी त्यांच्या घरी गेलो नाही. ज्या भागातून तक्रारी आल्या तिथेच फेरतपासणी करण्यात आली. कुठेही सरसकट फेरतपासणी झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

ज्या लाडक्या बहिणी फेरतपासणीत अपात्र पात्र ठरल्या, त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यांचे अर्ज बाद होणार असून त्यांना या पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरले होते. छाननीचे म्हणाल, तर प्रत्येक सरकारी योजनेत दोन-तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी छाननी होत असते, असं देखील तटकरे यांनी म्हटले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!