Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन होणार; ३६४ पदे भरण्यासही मंजुरी

राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन होणार; ३६४ पदे भरण्यासही मंजुरी

मुंबई: राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज (दि. १८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे ३४६ पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी ३१० पदे नियमित असतील तर ३६ पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.

नियमित पदे पुढीलप्रमाणे (पदनाम आणि संख्या): विशेष पोलीस महानिरीक्षक- एक, पोलीस उपमहानिरीक्षक एक, पोलीस अधीक्षक-तीन, अपर पोलीस अधीक्षक-तीन, पोलीस अधीक्षक- १०, पोलीस निरीक्षक १५, सहाय्यक पोलीस निरीक्षक – १५, पोलीस उपनिरीक्षक – २०, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – ३५, पोलीस हवालदार – ४८, पोलीस शिपाई – ८३, चालक पोलीस हवालदार -१८, चालक पोलीस शिपाई -३२, कार्यालय अधीक्षक – एक, प्रमुख लिपीक – दोन , वरिष्ठ श्रेणी लिपीक -११, कनिष्ठ श्रेणी लिपीक – सात, उच्च श्रेणी लघुलेखक – दोन, निम्न श्रेणी लघुलेखक – तीन.

बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने): वैज्ञानिक सहाय्यक-तीन, विधी अधिकारी – तीन, कार्यालयीन शिपाई -१८, सफाईगार – १२ एकूण – ३६. यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्च रुपये १९, २४, १८,३८० रुपये (एकोणीस कोटी चोवीस लाख अठरा हजार तीनशे ऐंशी रुपये) तर वाहन खरेदीसह अनावर्ती खर्चास ३,१२,९८,००० ( तीन कोटी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये) मान्यता देण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!