मुंबई : राज्य प्रशासनात फेरबदलाचा सपाटा लावलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आणखी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आठ दिवसांपूर्वी बदली झालेल्या प्रदीप पी. यांची नियुक्ती आता महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून ‘करण्यात आली आहे.
तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त असतील. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची बदली पर्यटन विभागाच्या सचिवपदी झाली आहे. तर वित्त विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांची बदली कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.


