नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या मंदीचे संकेत मिळत आहेत. कारण केंद्र सरकारची संस्था असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने अर्थात ‘एनएसओ’ने यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर हा ६.४ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. हा दर गेल्या चार वर्षातील सर्वात निचांकी दर आहे. रिझर्व्ह बँकेने देखील नुकताच जीडीपी वाढीचा दर हा ६.६ टक्के राहिल असे भाकीत केले होते.
सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीडीपी वाढीचा दर हा ८.४ टक्के इतका होता. त्यात या नव्या आर्थिक वर्षात मोठी घट होताना दिसते आहे. ‘एनएसओ’न म्हटले की, आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये जीडीपीत ६.४ टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला. सरकारचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताच्या जीडीपीच्या वाढीचा दर चार वर्षांमध्ये सर्वात निचांकी म्हणजेच ६.४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
या आकडेवारीवरुन याचाही अंदाज येतोय की, रियल ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढीचा अंदाज आहे. जे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७.२ टक्क्यांहून कमी आहे. याशिवाय आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९.३ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. जो गेल्या आर्थिक वर्षात ८.५ टक्क्यांहून थोडा अधिक होता. जीडीपीचा आधीच अंदाज व्यक्त केला जातो कारण याचा उपयोग केंद्रीय बजेट तयार करताना होतो. तसेच त्यामुळे आर्थिक घडामोडींमध्ये मंदीचे संकेतही दिले जातात. अप्रत्यक्ष मंदीने भारतीय रिझर्व्ह बँकेला आर्थिक वर्ष २०२४ च्या अंदाजावर काम करण्यासाठी प्रेरित केले होते. आरबीआयने आपला अंदाज ७.२ टक्क्यांवरुन ६.६ टक्के इतका वर्तवला होता.


