Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजकारणात खळबळ..! ठाकरेंचे 9 पैकी 8 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात खळबळ..! ठाकरेंचे 9 पैकी 8 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

Eknath Shinde Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांशी गुप्त संपर्क सुरू ठेवला असल्याची चर्चा रंगत असतानाच ठाण्यात कथित बैठकीचे वृत्त समोर आले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री शिंदे यांनी ठाण्यात ठाकरे गटातील काही खासदारांसोबत गुप्त बैठक घेतली. या बैठकीत शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या बैठकीला श्रीकांत शिंदे उपस्थित होते, अशीही चर्चा आहे.

या कथित बैठकीत अरविंद सावंत, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे यांच्यासह काही खासदार सहभागी झाल्याचे वृत्त आहे. तर ओमराजे निंबाळकर यांच्यासह काही जणांनी व्हिडीओ कॉलद्वारे सहभाग घेतल्याची माहिती दिली जात आहे.

मात्र, या सर्व चर्चांना संबंधित खासदारांनी फेटाळून लावले आहे. अरविंद सावंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटात जाणार नाही.” तर ओमराजे निंबाळकर यांनीही अशा कोणत्याही बैठकीबाबत अनभिज्ञता व्यक्त करत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले.

दरम्यान, खासदार संजय देशमुख यांनीही या कथित बैठकीत आपण सहभागी नसल्याचे स्पष्ट केले. “ना मला निमंत्रण होते, ना मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन बैठकीत होतो,” असे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!