Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ब्लॅकमेलिंगच्या आरोपावरून गुन्हा दाखल

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ब्लॅकमेलिंगच्या आरोपावरून गुन्हा दाखल

Narhari Zirwal : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादात आता पहिली कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील कफ परेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, तृतीयपंथीय व्यक्तीच्या तक्रारीवरून तिच्या भावाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी लावण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ मूळ नसून त्यात छेडछाड केल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ आणि ३५१(१) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बदनामी, गोपनीयतेचा भंग आणि धमकावणे यांसारख्या गंभीर आरोपांवरून तपास सुरू आहे.

दरम्यान, या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांकडून झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. स्वतः झिरवळ यांनी व्हिडिओ एडिट करून व्हायरल केल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेत व्हिडिओची सत्यता तपासली जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!