Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

घाटकोपरच्या केव्हीके शाळेत विद्यार्थ्यांना समोसा खाल्याने विषबाधा; कापूर पडलेल्या तेलात तळले होते समोसे

घाटकोपरच्या केव्हीके शाळेत विद्यार्थ्यांना समोसा खाल्याने विषबाधा; कापूर पडलेल्या तेलात तळले होते समोसे

मुंबई: घाटकोपरच्या केव्हीके शाळेतील विद्यार्थ्यांना समोसा खाल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची दखल घेत शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एन प्रभागातील शाळांना दिले आहेत. हे निर्देश मुंबईतील सर्व शाळांना आहेत. उपाहारगृहात स्वच्छता राखण्यासह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. त्यावर, केव्हीके शाळेने शिक्षणाधिकाऱ्यांना धक्कादायक खुलासा दिला आणि शाळेची बाजू मांडली.

झालं असं की कॅन्टीन चालकाकडून देव्हाऱ्यातील कापूर चुकून तेलात पडला. या तेलात तळलेले समोसे खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ही घटना सकाळी 10 वाजता घडली. यावेळी अनुदानित प्राथमिक इंग्रजी व गुजराती शाळेतील विद्यार्थी शाळेत नव्हते. कारण, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा दुपारी पावणेएकच्या सुमारास भरते, अशी भूमिका शाळेने मांडली आहे. आमच्या विभागातील सर्व शाळांना निर्देश दिलेले आहेत. शाळांमध्ये जिथे कुठे उपाहारगृह असेल, त्या ठिकाणी फूड सेफ्टी नियमांचे काटेकर पालन करणे आवश्यक आहे, असे निर्देश महानगरपालिकेचे एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र हंगे यांनी दिले.

कॅन्टीन चालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

पोलिसांनी शाळेचा कॅन्टीन मालक आणि चालक सुंदर गोपाल देवाडिगा विरोधात हलगर्जी व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार दिनेश जयसिंग शिंगोटे (४२) हे ६ नोव्हेंबरला गस्त घालत असताना विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याबद्दलची माहिती मिळाली होती. घटनेबाबत कळताच पालिका अधिकारी डॉ. रवींद्र हांगे व विलास पांडुरंग रत्नाकर (सॅनिटरी इन्स्पेक्टर) आणि संदीप जाधव (फायर स्टेशन ऑफिसर, विक्रोळी) यांनी तेलाचे नमुने ताब्यात घेतले, तर संदीप जाधव यांनी चार गॅस सिलिंडर व गॅस शेगडी तपासणीसाठी ताब्यात घेतली. हांगे यांनी कॅन्टीन चालक/मालक सुंदर देवाडिगा यांना कॅन्टीनच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे आरोग्य विभागाचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!