Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

HSRP Number Plate Alert : वाहनधारकांसाठी इशारा! HSRP नंबरप्लेट नसेल तर दररोज ₹१००० दंडाची कारवाई

HSRP Number Plate Alert : वाहनधारकांसाठी इशारा! HSRP नंबरप्लेट नसेल तर दररोज ₹१००० दंडाची कारवाई

मुंबई : राज्यातील २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी परिवहन विभागाने दिलेली अंतिम मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली असून, तरीही लाखो वाहनधारकांनी अद्याप ही नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आता कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

राज्यात सध्या सुमारे ३५ लाख वाहनांवर HSRP नंबरप्लेट नाही, अशी माहिती समोर आली आहे. केवळ सोलापूर जिल्ह्यातच दहा लाख वाहनांपैकी फक्त सुमारे पावणेतीन लाख वाहनधारकांनी HSRP नंबरप्लेट बसवली आहे. उर्वरित वाहनधारकांवर आता दंडात्मक कारवाई होणार आहे.

ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध

HSRP नंबरप्लेटसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर काही दिवसांत नंबरप्लेट उपलब्ध होईल आणि ती वाहनावर बसवणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही नंबरप्लेट अत्यंत महत्त्वाची असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दंड किती लागणार?

HSRP नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना ₹१००० दंड भरावा लागणार आहे. वारंवार नियमभंग झाल्यास हा दंड तिप्पट किंवा पाचपट होऊ शकतो. लवकरच वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू होण्याची शक्यता असून वाहनधारकांनी वेळीच नंबरप्लेट बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!