Ladki Bahin Yojana eKYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. योजनेतील e-KYC प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एक संधी दिली असून, आता e-KYC दुरुस्तीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून सांगितले की, e-KYC करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळे पात्र असूनही अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
अशा सर्व लाडक्या बहिणींना आता ऑनलाइन पोर्टलवरून e-KYC माहिती दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. e-KYC दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांनी [https://ladakibahin.maharashtra.gov.in/](https://ladakibahin.maharashtra.gov.in/) या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
वेबसाइटवरील “e-KYC मध्ये चुकीचे पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांसाठी” या पर्यायावर क्लिक करून आवश्यक प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी. दिलेल्या मुदतीत दुरुस्ती केल्यास पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
शासनाचे स्पष्ट आदेश
ही सुधारणा करण्याची ही शेवटची संधी असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदलही करण्यात आले आहेत.


