Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी… ! ३००० रुपयांना ब्रेक; लाडकी बहीण योजनेत फक्त १५००च जमा होणार, आयोगाचे राज्य सरकारला आदेश

मोठी बातमी… ! ३००० रुपयांना ब्रेक; लाडकी बहीण योजनेत फक्त १५००च जमा होणार, आयोगाचे राज्य सरकारला आदेश

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ३००० रुपये मिळणार नसल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, अग्रिम स्वरूपात जानेवारीचा हप्ता देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात फक्त डिसेंबर महिन्याचे १५०० रुपयेच जमा होणार आहेत.

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते एकत्र देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आचारसंहितेच्या काळात लाभ अग्रिम स्वरूपात देणे नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सरकारकडून स्पष्टीकरण मागवले. आयोगाने स्पष्ट केले की, आचारसंहितेपूर्वी सुरू असलेल्या योजनांचा नियमित लाभ देता येईल, मात्र जानेवारी महिन्याचा लाभ आगाऊ देता येणार नाही. तसेच या काळात नवीन लाभार्थी निवडण्यासही मनाई करण्यात आली आहे.

यानुसार, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे संक्रांतीला ३००० रुपये मिळण्याची अपेक्षा असलेल्या लाडक्या बहिणींना काहीशी निराशा सहन करावी लागणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!