Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी.. ! राज्यातील शाळांना सलग ५ दिवस सुट्टी; काय आहे कारण?

मोठी बातमी.. ! राज्यातील शाळांना सलग ५ दिवस सुट्टी; काय आहे कारण?

School Holidays : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मकरसंक्रांत सण आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १४ जानेवारीपासून शाळांना सुट्टी लागणार असून, शाळा थेट पुढील सोमवारी पुन्हा सुरू होणार आहेत.

१४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत साजरी केली जाणार आहे. त्यानंतर १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने सुरक्षेच्या आणि निवडणूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदानानंतर १७ जानेवारी रोजी शनिवार असून अनेक शाळांना नेहमीची साप्ताहिक सुट्टी असते, तर १८ जानेवारीला रविवारची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे १४ ते १८ जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

दरम्यान, अनेक शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची निवडणूक ड्युटी लागल्याने शाळांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्या शाळा, कार्यालये, संस्था आणि सभागृहांमध्ये मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी मतदानाच्या आदल्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी पूर्णपणे सुट्टी राहणार आहे.

निवडणूक साहित्याचे वाटप, मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या तयारीसाठी ही सुट्टी आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!