Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

Rain Alert : राज्यात सध्या किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. धुळे आणि निफाड येथे थंडीच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली असून, नागरिक अक्षरशः गारठले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, किमान तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस घट झाल्यास थंडीची लाट, तर ६.५ अंशांहून अधिक घट झाल्यास तीव्र थंडीची लाट असल्याचे मानले जाते. रविवारी धुळे येथे राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर निफाडमध्ये ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

मालेगाव, गोंदिया आणि भंडारा येथेही किमान तापमान १० अंशांखाली गेले असून, उर्वरित राज्यात तापमान १० अंशांच्या वर आहे. आज राज्यात काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तासांत किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे गारठा काहीसा कमी होऊ शकतो. मात्र, १३ आणि १४ जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थंडी आणि अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!