Today मंगळवार, 29th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयातून महत्त्वाची अपडेट

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयातून महत्त्वाची अपडेट

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत (ZP Election) मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हं दिसत आहेत.

सर्व जिल्हा परिषद निवडणुका एकाच टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी करणारी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या या नव्या याचिकेमुळे निवडणूक प्रक्रिया पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याचिकाकर्त्यांनी राज्यातील सर्व 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, असा दावा न्यायालयात केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल काय येतो, याकडे राजकीय वर्तुळासह राज्य निवडणूक आयोगाचेही लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!