IAS Transfer : महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठा उलथापालथ करत राज्य सरकारने ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अलीकडे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता प्रशासनातही उमटताना दिसत असून या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
याआधी खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांची मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) येथील प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मंत्रालयातील महसूल व वन विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, नव्या आदेशानुसार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये रुबल अग्रवाल, नयना गुंडे यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोणाची कुठे नियुक्ती?
एम. देवेंद्र सिंग यांची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहआयुक्त म्हणून बदली
डॉ. मैनक घोष यांची सांगली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
प्रियंवदा म्हाड्डळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
अशोक काकडे यांची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC), मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती
राहुल रेखवार यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात सदस्य सचिव म्हणून बदली
श्वेता सिंघल यांची महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती
रुबल प्रखेर अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती
नयना गुंडे यांची अमरावती विभागीय आयुक्त म्हणून बदली
या बदल्यांमुळे प्रशासनात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून येत्या काळात याचे परिणाम कसे दिसतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


