Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

“मी महादेवाचा अवतार” म्हणत फसवणूक; पुण्यात स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक

“मी महादेवाचा अवतार” म्हणत फसवणूक; पुण्यात स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक

Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून स्वतःला देवाचा अवतार सांगत महिलेची फसवणूक करून अत्याचार केल्याच्या आरोपावरून स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित ३५ वर्षीय महिला पुण्यात वास्तव्यास असून तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

तक्रारीनुसार, २०२३ मध्ये वसई येथे महिलेची ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. तिच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत वैद्यने तिला अध्यात्म शिकवण्याच्या नावाखाली जवळ केले. डिसेंबर २०२३ मध्ये तो पुण्यात आला आणि “मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस” असे सांगत तिचा विश्वास संपादन केला.

यानंतर त्याने तिला मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन गुंगीकारक पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत ही बाब आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर त्यांनी वसई येथे तक्रार दाखल केली आणि पुढील कारवाईसाठी गुन्हा पुण्यात वर्ग करण्यात आला.

दरम्यान, पुणे पोलिसांनी शोधमोहीम राबवत अखेर पिंपरी परिसरातून ऋषिकेश वैद्य याला ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!