Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रेम की क्रोधाचा उद्रेक? चिकनच्या हट्टावरून आईने घेतला मुलाचा जीव, महाराष्ट्राचं विद्रूप चित्र

प्रेम की क्रोधाचा उद्रेक? चिकनच्या हट्टावरून आईने घेतला मुलाचा जीव, महाराष्ट्राचं विद्रूप चित्र

मुंबई : आईचे प्रेम हे जगातील सर्वात पवित्र आणि अनंत सागरासारखे असते, असे आपण सांगतो. आपल्या पोटच्या गोळ्यांसाठी आई जीवही देऊ शकते, अशी अनेक उदाहरणे आहेत. पण कधीकधी हेच प्रेम क्रोधात बदलते आणि ते भयावह रूप धारण करते. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील धनसार काशीपाडा येथे घडलेली ही घटना याचाच एक विद्रूप चित्रण आहे.

एका आईने आपल्या सात वर्षीय मुलाला चिकन खाण्याच्या हट्टावरून बेदम मारहाण केली, ज्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर दहा वर्षांची दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सगळ्यांचे मन सुन्न झाले असून, आई-मुलांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील धनसार काशीपाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी आई पल्लवी धोमडे (३८ वर्षे) ही आपल्या दोन मुलांसोबत एकटी राहत होती. संध्याकाळी जेवणाच्या वेळी सात वर्षीय मुलाने चिकन खाण्याची मागणी केली. हा छोटासा हट्ट तिला खूपच खटकला आणि राग अनावर झाला. संतापलेल्या पल्लवीने घरात असलेल्या चपाती लाटायच्या लाटणीने मुलाच्या डोक्यावर जोरदार मारहाण सुरू केली. या मारहाणीत मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मारहाण केवळ मुलावरच थांबली नाही. दहा वर्षीय बहिणीलाही याच रागातून तीने बेदम ठेचले. मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण जीव धोक्यात आहे. शेजाऱ्यांनी घटनेची कल्पना पोलिसांना दिल्यानंतर धावते आलेल्या पालघर पोलिसांनी पल्लवी धोमडे याला तात्काळ अटक केली आहे.

पालघर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, या प्रकरणात आईवर हत्येचा आणि गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून येते की, आर्थिक तंगी आणि कौटुंबिक कलह यामुळे तिच्या मनात अतिरेकी विचार आले असावेत. मात्र, चिकनसारख्या किरकोळ कारणाने अशी क्रूरता करणे हे अतिशय धक्कादायक आहे. पोलीस घटनास्थळाची छाननी करत असून, आरोपीचा वैद्यकीय तपास आणि मानसिक स्थितीची तपासणीही केली जाणार आहे. तपास अधिकृतरित्या सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!