अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझने लग्न केले आहे. तिने वयाच्या ३३ व्या वर्षी तिचा एक्स-बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोशी लग्न केले. तिचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गायिका सेलेना गोमेझ आता मिस ते मिसेसमध्ये बदलली आहे. सेलेनाने तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोशी लग्न केले आहे. नवीन वैवाहिक जीवनाला तिने आता सुरुवात केली आहे. आता तिला जगभरातील चाहत्यांकडून प्रेम मिळत आहे.
सेलेनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नाच्या फोटोंमध्ये सेलेना पांढऱ्या लग्नाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. वधू म्हणून ती राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाही. तिने पांढऱ्या गाऊनसह कमीत कमी दागिने घातले होते. तिचा मेकअप तिचे सौंदर्य खुलून आले होते. सेलेना तिच्या लग्नाच्या लूकवरून चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा नवरा बेनी ब्लँको काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून आला. त्याचा हा लूक एकदमच हटके असा दिसत होता.
लग्नाच्या फोटोंमध्ये सेलेनाने तिच्या हिऱ्याच्या अंगठीचा लूक दाखवला. अभिनेत्रीने तिचा जोडीदार बेनी ब्लँकोसोबत अनेक रोमँटिक पोझ देखील दिल्या. नवविवाहित जोडपे एकमेकांच्या मिठीत मग्न असल्याचे दिसून आले. सेलेना आणि बेनी ब्लँकोची जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांची मने जिंकत आहे.


