Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईत भाजप १५०, तर शिवसेना १००हुन अधिक जागांवर आग्रही; महायुतीत जागावाटपावरून संघर्ष होणार?

मुंबईत भाजप १५०, तर शिवसेना १००हुन अधिक जागांवर आग्रही; महायुतीत जागावाटपावरून संघर्ष होणार?

Mumbai Municipal Corporation Election 2025 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमीवर महायुती आघाडीत जागावाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप दीडशे (१४०-१५०) जागांवर लढण्यासाठी आग्रही असताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १०० हून अधिक जागांची मागणी केली आहे. एकूण २२७ जागांसाठी ही चुरस रंगतदार होणार असून, याबाबत चर्चा करण्यासाठी महायुतीची समन्वय समितीची पहिली बैठक उद्या (१६ डिसेंबर) मुंबईत होणार आहे.

या समितीत भाजपकडून ४ तर शिवसेनेकडून ६ नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत विद्यमान नगरसेवकांच्या जागा वगळता इतर जागांवर प्रामुख्याने चर्चा अपेक्षित आहे. प्रत्येक वॉर्डातील राजकीय समीकरणे, पक्षाचे बलाबल, गेल्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी आणि जिंकण्याची शक्यता यांचा विचार करून एक अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीने मुंबईसह इतर महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागावाटपावरून दोन्ही प्रमुख पक्ष आग्रही असल्याने संघर्ष टाळण्यासाठी ही समिती महत्त्वाची ठरणार आहे. उर्वरित जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि इतर छोट्या मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.

या घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. महायुतीला एकजूट दाखवत ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला रोखायचे आहे, पण अंतर्गत वाटाघाटी यशस्वी होण्यावरच यश अवलंबून आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!