पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, परभणी येथे अप्रेंटिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला परभणी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 29 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, विद्युत व संगणक विभाग, परभणी गणपती चौक, नवीन पॉवर हाऊस, जिंतूर रोड, परभणी. ४३१४०१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


