Today मंगळवार, 22nd सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nagpur Crime : शेतातातील विहिरीच्या वादातून मोठ्या भावानं लहान भावाला निर्घृणपणे संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

Nagpur Crime : शेतातातील विहिरीच्या वादातून मोठ्या भावानं लहान भावाला निर्घृणपणे संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

Nagpur Crime : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहगाव-सावंगी शिवारात संपत्ती आणि विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाने भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मृतक अरुण रामाजी तुरारे (वय ४३, रा. मोहपा) यांची हत्या त्यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर रामाजी तुरारे (वय ५८, निवृत्त सीआरपीएफ जवान) यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये शेती, विहीर, पाणी आणि पाइपलाइनच्या वाद सुरू होता. १३ डिसेंबर रोजी अरुण हे खेतात काम करत असताना वाद विकोपाला गेला. चंद्रशेखर यांनी गोळ्या झाडून अरुण यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला.

अरुण घरी परत न आल्याने पत्नी जोत्स्ना यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या शोधमोहिमेत नाल्यात जळालेल्या अवस्थेत मानवी हाडे आणि अवशेष सापडले. चौकशीत चंद्रशेखर यांनी गुन्हा कबूल केला. कळमेश्वर पोलिसांनी अवघ्या ४ तासांत गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून

दुसरीकडे जळगाव शहरालगतच्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनवणे या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत मारेकऱ्यांनी सागरच्या डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत सोडले होते.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सागरला तात्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!