Today बुधवार, 12th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्य कुडकुडले..! धुळे ६ अंशांवर; ‘या’ ४ जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट, हवामान विभागाचा अलर्ट

राज्य कुडकुडले..! धुळे ६ अंशांवर; ‘या’ ४ जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट, हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून, जनजीवनावर याचा मोठा परिणाम दिसून येतोय. सकाळी दाट धुके आणि दिवसभर हुडहुडी भरवणारी थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाही काळजी घ्यावी लागत आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) धुळे, जेऊर (सोलापूर), निफाड (नाशिक) आणि परभणी या चार भागांत तीव्र थंडीच्या लाटेचा हाय अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी तापमान ५-६ अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. ला नीना प्रभावामुळे जानेवारीपर्यंत ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

पुण्यात थंडीचा जोर वाढला

पुणे, नाशिक, अहमदनगर आणि सातारा भागांत गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुणेकरांना सकाळी थंडीची हुडहुडी जाणवत असून, दिवसेंदिवस तापमान घसरत आहे.

साताऱ्यात ‘मिनी काश्मीर’ची अनुभूती

सातारा जिल्ह्यात थंडीचा प्रभाव आणखी तीव्र आहे. महाबळेश्वरपेक्षा साताऱ्यात तापमान कमी नोंदवले गेले असून, येथे ९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या घटली असून, नागरिक ‘मिनी काश्मीर’सारखा अनुभव घेत आहेत.

काहीसा दिलासा अपेक्षित

हवामान विभागानुसार, येत्या ७ दिवसांत तापमानात मोठा बदल होणार नाही, मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात थोडी वाढ होऊन थंडीचा जोर किंचित कमी होईल. तरी उत्तर महाराष्ट्रात दाट धुके आणि थंडी कायम राहणार आहे. थंडीपासून बचावासाठी गरम कपडे, शेकोट्या आणि गरम पेयांचा वापर करा. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!