Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Petrol-Diesel Rate Hike: राज्यात इंधन दरवाढीची चाहूल? पुणे-सोलापुरात स्पीड पेट्रोल महाग; सर्वसामान्यांवर पुन्हा भार

Petrol-Diesel Rate Hike: राज्यात इंधन दरवाढीची चाहूल? पुणे-सोलापुरात स्पीड पेट्रोल महाग; सर्वसामान्यांवर पुन्हा भार

Petrol-Diesel Rate Hike : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असतानाही देशातील इंधन दरांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे आणि सोलापूर येथे पेट्रोलच्या दरात किरकोळ वाढ नोंदवली गेली असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होत आहे.

सोलापुरात साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला नसला तरी ‘स्पीड पेट्रोल’च्या किंमतीत तब्बल २ रुपयांची वाढ झाली आहे. साधे पेट्रोल सुमारे १०४ रुपयांवर स्थिर असताना स्पीड पेट्रोलचा दर १११ वरून ११३ रुपयांवर गेला आहे. पुण्यातही याच धर्तीवर दरवाढ दिसून आली आहे. पेट्रोलचा साठा पुरेसा असल्याचे पंप चालक सांगत असले तरी नागरिकांमध्ये दरवाढीच्या भीतीमुळे गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी चढ-उतार सुरू आहे. अलीकडेच ब्रेंट क्रूडचा दर 119 डॉलर प्रति बॅरलवरून घसरला, तर अमेरिकन WTI क्रूडही 100 डॉलरच्या खाली आला. मध्यपूर्वेतील तणाव आणि युद्धपरिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Indian Oil Corporation Limited च्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख महानगरांमध्ये दर स्थिर आहेत. दिल्ली येथे पेट्रोल 94.77 रुपये तर डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबई मध्ये पेट्रोल 103.54 रुपये आणि डिझेल 90.03 रुपये आहे. कोलकाता येथे पेट्रोल 105.41 रुपये, तर चेन्नई मध्ये पेट्रोल 101.06 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत याच महिन्यात ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांसाठी हा आणखी एक आर्थिक फटका ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!