Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai News : पोलीस दलात खळबळ! शिपायाने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं

Mumbai News : पोलीस दलात खळबळ! शिपायाने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं

Mumbai News : मुंबई येथून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई किशोर म्हस्के यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर म्हस्के हे घाटकोपर परिसरातील सरकारी पोलीस वसाहतीत राहत होते. मंगळवारी घरात कोणीही नसताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने कौटुंबिक कारण, कामाचा ताण किंवा इतर कोणतेही कारण होते का, याचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात शोककळा पसरली असून सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!