Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raj K Purohit Passes Away : भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुलाच्या विजयानंतर दोन दिवसांतच घेतला अखेरचा श्वास

Raj K Purohit Passes Away : भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुलाच्या विजयानंतर दोन दिवसांतच घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच उत्तर भारतीय समाजातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले राज के. पुरोहित यांचे रविवारी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राज के. पुरोहित यांचे पार्थिव आज, रविवार १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मरीन ड्राइव्ह येथील राजहंस बिल्डिंग, जी रोड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

राज पुरोहित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्य मंत्रिपद भूषवले होते. स्पष्टवक्तेपणा, आक्रमक भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळे ते विशेष ओळखले जात होते. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते प्रेमाने ‘राजभाई’ म्हणून ओळखले जात. गिरगाव, काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मजबूत पकड होती, तसेच दक्षिण मुंबईतील राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२१ मधून त्यांचे पुत्र आकाश पुरोहित विजयी झाले होते. मुलाच्या या राजकीय यशानंतर अवघ्या दोन दिवसांतच राज के. पुरोहित यांचे निधन झाल्याने, पुरोहित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने भाजपमध्येच नव्हे, तर मुंबईच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!