Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raju Patil : ‘जरा जपून फिरा…’ गुणरत्न सदावर्तेंना मनसेचा इशारा; राजू पाटलांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Raju Patil : ‘जरा जपून फिरा…’ गुणरत्न सदावर्तेंना मनसेचा इशारा; राजू पाटलांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Raju Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी त्यांना सूचक इशारा दिला आहे.

राजू पाटील म्हणाले, “फिरताना जरा जपून फिरा. कोणीही येऊन हल्ला करेल आणि नंतर त्याचं खापर मनसेवर फोडलं जाईल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

यावेळी त्यांनी सदावर्तेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, “कोण काय बोलतंय यापेक्षा त्यांची लायकी काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे,” असे म्हटले. अशा व्यक्तींना महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, डोंबिवलीतील ‘आन ठाकूर मान ठाकूर शौर्यगाथा’ कार्यक्रमावरूनही राजू पाटील यांनी भाजपवर टीका केली. आगरी समाजाची दखल घेणे स्वागतार्ह असले तरी प्रत्येक समाजासाठी समान पद्धतीने काम झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!