Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Holidays : सोमवारी बँका बंद की सुरू? वाचा दिवाळीतील आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी, एका क्लीकवर

Bank Holidays : सोमवारी बँका बंद की सुरू? वाचा दिवाळीतील आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी, एका क्लीकवर

मुंबई : दिवाळी सणाची धुम सुरू झाली असून, शाळा-कॉलेजांपासून बँकांपर्यंत सर्वत्र सुट्ट्यांचा कालावधी आहे. जर तुम्हाला दिवाळीत बँकेत काही काम असेल, तर ही यादी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. भारतात विविध राज्यांनुसार दिवाळीच्या तारखा वेगळ्या असल्याने बँक सुट्ट्यांमध्येही फरक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शनानुसार, धनत्रयोदशी (१८ ऑक्टोबर, शनिवार) रोजी देशभरातील बँका उघड्या होत्या, फक्त आसाममध्ये काटी बिहू सणानिमित्त सुट्टी होती. आता पाहूया पुढील दिवसांच्या सुट्ट्या.

२० ऑक्टोबर (सोमवार) – नरक चतुर्दशी / छोटी दिवाळी : या दिवशी महाराष्ट्रात बँका सुरू राहतील. मात्र, त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, आसाम, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.

२१ ऑक्टोबर (मंगळवार) – दिवाळी अमावस्या / लक्ष्मी पूजन : महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश आणि सिक्कीममध्ये बँका बंद राहतील. इतर राज्यांमध्ये सामान्य दिवस.

२२ ऑक्टोबर (बुधवार) – गोवर्धन पूजा / बलिप्रतिपडा / विक्रम संवत नूतन वर्ष : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बँका बंद राहतील.

२३ ऑक्टोबर (गुरुवार) – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती : गुजरात, सिक्कीम, मणिपुर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.

२७ आणि २८ ऑक्टोबर (सोमवार आणि मंगळवार) – छठ पूजा : पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये बँका बंद राहतील.

३१ ऑक्टोबर (शुक्रवार) – सरदार वल्लभभाई पटेल जयंती : अहमदाबाद (गुजरात) मध्ये बँका बंद राहतील.

महाराष्ट्रात दिवाळी मुख्यतः २१ आणि २२ ऑक्टोबरला साजरी केली जाते, त्यामुळे सोमवारी (२०) बँका उघड्या राहतील, पण मंगळवार आणि बुधवार बंद असतील. सुट्ट्यांच्या कालावधीत बँका बंद असल्या तरी ऑनलाइन सेवा सुरू राहतील. एटीएम, मोबाइल अॅप, UPI द्वारे व्यवहार, पैसे हस्तांतरण आणि बिल भरणे शक्य आहे. महत्त्वाचे काम आधीच पूर्ण करा, जेणेकरून सण साजरा करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!