पुणे : महाराष्ट्र शासनाच्या एका विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यामध्ये रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे कायदा अधिकारी (करार) या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कायदा अधिकारी (करार).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी,
– वेतन / मानधन : दरमहा 45000
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला (एमएस) -444 104.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.mahabeej.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


