Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर आणखी संकट? महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार; तटकरेचं सूचक वक्तव्य

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर आणखी संकट? महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार; तटकरेचं सूचक वक्तव्य

Rupali Chakankar : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांना आता आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही उचलबांगडी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे सहभागी झाले होते. अशोक खरात प्रकरणामुळे पक्षाची होत असलेली बदनामी कशी रोखावी, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यानच रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाबाबत संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या लवकरच या पदाचाही राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, त्यांच्या जागी नवीन नेतृत्वाची निवड करण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सुनील तटकरे यांनी या विषयावर सूचक प्रतिक्रिया दिली. “या बाबत चर्चा होईल, तेव्हा निर्णय घेतला जाईल. पक्ष कोणालाही पाठीशी घालणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशोक खरात प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी, ही पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारला असून तो पुढील प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.

एकूणच, खरात प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!