मुंबई: पहलगाम हल्ल्यात झालेल्या 26 नागरिकांच्या मृत्यूच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (PoJK) मधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या कारवाईला देशभरातून समर्थन मिळाले असून, याला शहिदांचा बदला मानले जात आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर तीव्र निशाणा साधला. त्यांनी म्हटलं आहे की, ‘पहलगाम हल्ल्यात 26 मातांचे सिंदूर पुसले गेले. हा संताप अजूनही शांत झालेला नाही. दहशतवादी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही.’
भाजपवर देशद्रोहाचा आरोप –
तथापि, 14 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळवला जात असल्याची टीका करत त्यांनी भाजपवर देशद्रोहाचा आरोप केला. भाजपच्या मंत्र्यांची मुले हा सामना पाहायला जातील, हा थेट देशद्रोह आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे. या विरोधात शिवसेना (UBT) महिला आघाडी रविवारी ‘सिंदूर रक्षा आंदोलन’ करणार असून, महाराष्ट्रातील हजारो महिला आपल्या घरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
नेपाळातील आंदोलनांचा संदर्भ देत राऊत यांनी इशारा दिला की, ‘नेपाळमध्ये भ्रष्टाचार, हुकूमशाही आणि घराणेशाहीविरुद्ध जी आग लागली आहे, तीच परिस्थिती भारतातही उद्भवू शकते. त्यांनी आरोप केला की, सध्या मोदी सरकार केवळ महात्मा गांधींच्या अहिंसक विचारसरणीमुळे टिकून आहे. तुम्ही गांधींना कितीही शिव्या दिल्या तरी मोदीजी, तुमचे सरकार गांधींच्या विचारांमुळेच उभे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पहलगाँव हमले में 26 माँ-बहनों का सिंदूर मिटा, उनका आक्रोश अभी थमा नहीं।⁰ऑपरेशन सिंदूर, जो आतंकी पाकिस्तान को तोड़ने के लिए शुरू हुआ, अभी खत्म नहीं हुआ।⁰फिर भी अबू धाबी में भारत-पाक क्रिकेट मैच खेला जा रहा है।(14th September)⁰बीजेपी मंत्रियों के बच्चे इसे देखने ज़रूर जाएँगे।… pic.twitter.com/tkQYMcb5nZ
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2025
दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्राच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. नेपाळ एकेकाळी आपला जवळचा मित्र देश होता. संकटाच्या वेळी भारताने मदत केली नाही, हे परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी बेरोजगारी, मोफत रेशन योजना, आणि श्रीमंत नेत्यांच्या परदेशातील मुलांचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारवर निशाणा साधला.


