Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अमेरिकेची चीनविरोधात कडक कारवाई; चिनी नागरिकांना आता NASA मध्ये प्रवेशबंदी

अमेरिकेची चीनविरोधात कडक कारवाई; चिनी नागरिकांना आता NASA मध्ये प्रवेशबंदी

नवी दिल्ली: अमेरिका आणि चीनमधील तणाव हे नवीन नाही, मात्र माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर या तणावात अधिक वाढ झाली. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन अंतराळ संस्था NASA ने चीनविरोधी कठोर पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे नासाच्या कार्यक्रमांमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चिनी नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकन सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, आता चिनी नागरिकांना नासामध्ये कोणत्याही अंतराळ कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. अमेरिकेत व्हिसावर राहणाऱ्या नागरिकांनाही ही बंदी लागू होणार आहे. ट्रम्प प्रशासनातील वाढत्या चीनविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नासाच्या प्रेस सेक्रेटरी बेथानी स्टीव्हन्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आमच्या कामाची सुरक्षितता टिकवण्यासाठी आणि आमच्या सुविधा, वस्तू तसेच नेटवर्कला सायबर आणि फिजिकल धोक्यापासून वाचवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.’

गेल्या काही दिवसांपासून नासामध्ये काम करणाऱ्या अनेक चिनी नागरिकांना बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे. त्यांना अचानक IT सिस्टिममधून लॉगआउट करण्यात आले तसेच महत्वाच्या बैठकींना उपस्थित राहण्यासही बंदी घालण्यात आली. त्यामुळे नासामधील चिनी कर्मचाऱ्यांचे भविष्य आता अधांरात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!