Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election : ठाकरे सेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दिग्गज नेत्यांच्या वारसांना मोठी संधी

BMC Election : ठाकरे सेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दिग्गज नेत्यांच्या वारसांना मोठी संधी

मुंबई : मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, यात जुन्या दिग्गज नेत्यांसह त्यांच्या वारसांना आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. रविवारी रात्रभर मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारांची भेट घेऊन एबी फॉर्म दिले. हे सर्व उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सेनेने एकूण ९० उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. उर्वरित उमेदवारांना आज फॉर्म देण्यात येणार असून, दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. मनसेसोबतच्या युतीनंतर ठाकरे सेना सुमारे १४५-१५० जागांवर लढणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिग्गजांच्या वारसांना संधी :
– माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत (प्रभाग ८९)
– आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू (प्रभाग ५४)
– आमदार हारून खान यांची कन्या सबा हारून खान (प्रभाग ६४)
– माजी आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या सुप्रदा फातर्पेकर (प्रभाग १५०)

शिवसेना (उबाठा) च्या पहिल्या यादीतील ४५ उमेदवार :

१. प्रभाग २ – धनश्री कोलगे
२. प्रभाग ३ – रोशनी गायकवाड
३. प्रभाग १६ – स्वाती बोरकर
४. प्रभाग २६ – धर्मेंद्र काळे
५. प्रभाग २९ – सचिन पाटील
६. प्रभाग ४० – सुहास वाडकर
७. प्रभाग ४९ – संगीता सुतार
८. प्रभाग ५४ – अंकित प्रभू
९. प्रभाग ५७ – रोहन शिंदे
१०. प्रभाग ५९ – शैलेश फणसे
११. प्रभाग ६० – मेघना विशाल काकडे माने
१२. प्रभाग ६१ – सेजल दयानंद सावंत
१३. प्रभाग ६२ – झीशान चंगेज मुलतानी
१४. प्रभाग ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
१५. प्रभाग ६४ – सबा हारून खान
१६. प्रभाग ६५ – प्रसाद आयरे
१७. प्रभाग ८९ – गीतेश राऊत
१८. प्रभाग ९३ – रोहिणी कांबळे
१९. प्रभाग ९५ – हरी शास्त्री
२०. प्रभाग १०० – साधना वरस्कर
२१. प्रभाग १०५ – अर्चना चौरे
२२. प्रभाग १११ – दीपक सावंत
२३. प्रभाग ११७ – श्वेता पावसकर
२४. प्रभाग ११८ – सुनीता जाधव
२५. प्रभाग १२० – विश्वास शिंदे
२६. प्रभाग १२३ – सुनील मोरे
२७. प्रभाग १२४ – सकीना शेख
२८. प्रभाग १२७ – स्वरूपा पाटील
२९. प्रभाग १३७ – महादेव आंबेकर
३०. प्रभाग १३८ – अर्जुन शिंदे
३१. प्रभाग १४१ – विठ्ठल लोकरे
३२. प्रभाग १४२ – सुनंदा लोकरे
३३. प्रभाग १४८ – प्रमोद शिंदे
३४. प्रभाग १५० – सुप्रदा फातर्पेकर
३५. प्रभाग १५५ – स्नेहल शिवकर
३६. प्रभाग १५६ – संजना संतोष कासले
३७. प्रभाग १६४ – साईनाथ साधू कटके
३८. प्रभाग १६७ – सुवर्णा मोरे
३९. प्रभाग १६८ – सुधीर खातू
४०. प्रभाग २०६ – सचिन पडवळ
४१. प्रभाग २०८ – रमाकांत रहाटे
४२. प्रभाग २१५ – किरण बालसराफ
४३. प्रभाग २१८ – गीता अहिरेकर
४४. प्रभाग २२२ – संपत ठाकूर
४५. प्रभाग २२५ – अजिंक्य धात्रक

ही यादी जुन्या-नव्यांचा समन्वय साधणारी असून, मराठीबहुल भागातील दादर, वरळी, माहिम आदी प्रभागांसाठी उमेदवारांची नावे लवकरच जाहीर होतील. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. ठाकरे सेना-मनसे युती महायुतीला कडवी टक्कर देणार असल्याचे चित्र आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!