Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अहिल्यानगर हादरलं! १८ वर्षीय तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार; नग्न फोटोंची धमकी देऊन सोडले

अहिल्यानगर हादरलं! १८ वर्षीय तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार; नग्न फोटोंची धमकी देऊन सोडले

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात एका १८ वर्षीय तरुणीवर अपहरण आणि सामूहिक अत्याचाराची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. २४ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेत, तिन्ही आरोपींनी मदतीचा बहाणा करून तरुणीला दुचाकीवर बसवले आणि निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर १२ ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.

त्या रात्री काय घडलं?

२४ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी माळीवाडा बसस्थानकावर केडगावला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. यावेळी तिच्या ओळखीचे रेहान शेख (वय २२, रा. झेंडीगेट) आणि मुज्जमील शेख (वय २०, रा. झेंडीगेट) हे दोघे दुचाकीवर आले. त्यांनी “आम्ही तुला केडगावला सोडतो” असे सांगून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. तिने विरोध केला असता, त्यांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि जीवे मारण्याची धमकी देत कायनेटिक चौकामार्गे अरणगावच्या दिशेने नेले. केडगाव शिवारातील ‘५०० बंगला’ नावाच्या अपूर्ण बांधकामाच्या निर्जन ठिकाणी त्यांनी तिला आणले.

तिथे तिसरा आरोपी सरवर बॉस आधीपासूनच उपस्थित होता. तिघांनी चाकूचा धाक दाखवून तरुणीवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. याचवेळी रेहान शेखने तिचे नग्न फोटो काढले आणि “हा प्रकार कोणाला सांगितलास तर फोटो व्हायरल करू” अशी धमकी दिली. “आमच्यावर अनेक गुन्हे आहेत, आमचे कोणी काही बिगडवू शकत नाही,” असेही आरोपींनी सांगितले. यानंतर मध्यरात्री तिला केडगावमधील सोनेवाडी फाट्यावर सोडून आरोपी पसार झाले.

पीडितेने १२ ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी रेहान रऊफ शेख, मुज्जमील शेख आणि सरवर बॉस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली असून, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!