IND vs WI Test: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव करून दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. हा शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पहिला कसोटी मालिका विजय ठरला. दुसऱ्या डावात भारतासमोर केवळ १२१ धावांचे लक्ष्य होते, जे संघाने पहिल्याच तासात पूर्ण केले. केएल राहुलने नाबाद ५८ धावा करत विजयी चौकार ठोकला.
भारताचा पहिला डाव – जयस्वाल आणि गिलची शतके
नाणेफेक जिंकून गिलने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरली. यशस्वी जयस्वालने शानदार शतक ठोकले आणि १७५ धावा करत चमक दाखवली. त्याने २२ चौकार मारले. साई सुदर्शनने ८७ धावा, तर केएल राहुलने ३८ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने शतक झळकावले आणि नाबाद राहिला. भारताने पहिला डाव ५१८/५ धावांवर घोषित केला. नितीश कुमार रेड्डी (४३) आणि ध्रुव जुरेल (४४) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
𝐆𝐀𝐌𝐄. 𝐒𝐄𝐓. 𝐃𝐎𝐍𝐄 ✅
A comfortable 7️⃣-wicket victory for #TeamIndia in Delhi ✌️
With that they take the series 2️⃣-0️⃣ 🏆
Shubman Gill registers his first series win as Captain 👏
Scorecard ▶ https://t.co/GYLslRyLf8#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/IwQFHmSQ5O
— BCCI (@BCCI) October 14, 2025
कुलदीप यादवचा पाच बळींचा पराक्रम
वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ २४८ धावांवर संपुष्टात आला.
कुलदीप यादवने ५ बळी घेतले, तर रवींद्र जडेजाने ३, आणि बुमराह व सिराजने प्रत्येकी १ बळी घेतला. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात जॉन कॅम्पबेल (११५) आणि शाई होप (१०३) यांनी शानदार शतके झळकावली. कॅम्पबेल हा २००२ नंतर भारतात कसोटी शतक करणारा पहिला वेस्ट इंडिजचा फलंदाज ठरला. होपचे हे २०१७ नंतरचे पहिले कसोटी शतक होते. चेस (४०), ग्रीव्हज (५०) आणि सील्स (३२) यांनीही संघर्ष केला, पण संघाला केवळ १२१ धावांचे लक्ष्य ठेवता आले.
भारताचा विजयाचा डाव
भारताने हा लक्ष्य पाठलाग सहज केला. जयस्वाल (८) लवकर बाद झाला, परंतु राहुल (५८) आणि सुदर्शन (३९) यांनी भारताला स्थिरता दिली. शुभमन गिल (१३) बाद झाल्यानंतर राहुलने विजयी चौकार मारत सामना संपवला. भारताचा हा विजय शुभमन गिलच्या नेतृत्वाचा ऐतिहासिक प्रारंभ ठरला असून, युवा कर्णधार म्हणून त्याच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली आहे.


