Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Crime: बीडच्या जेलमध्ये प्रतिक घुलेची गुंडगिरी; थेट कारागृहातील कर्मचाऱ्याला…

Beed Crime: बीडच्या जेलमध्ये प्रतिक घुलेची गुंडगिरी; थेट कारागृहातील कर्मचाऱ्याला…

Beed Crime: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असून, या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी बीड जिल्हा कारागृहात कैद आहेत. परंतु, आरोपी प्रतीक घुलेने कारागृहातील कर्मचाऱ्याला थेट धमकी दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. त्याने ‘बाहेर आल्यावर तुला बघतो’ अशी धमकी दिल्यामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.

वाल्मिक कराडबाबत गंभीर आरोप

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी प्रतीक घुलेने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, प्रतीक घुलेला प्रकरणाबाबत कोणताही पश्चाताप नाही, तर त्याने धमकी देत पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारागृह अधिक्षकांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा साडी चोळी भेट देऊ असा इशाराही गलधर यांनी दिला आहे. मकोकातील काही आरोपी दुसऱ्या कारागृहात हलवण्याचे आदेश असूनही त्यांना येथे का ठेवले जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वप्निल गलधर यांनी वाल्मिक कराड कारागृहात मोबाईल वापरत असून रिचार्ज करत असल्याचा आरोप देखील केला.

हेही वाचा – मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक राजाराम सिद्धलिंग चांदणे यांनी फोनवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कारागृहातील कर्मचारी गवते असून त्यांनी अशी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. धमकीचा प्रकार घडला नसल्याचे आमचे निरीक्षण आहे. कारागृहात सीसीटीव्ही असल्यामुळे कोणतीही घटना लपून राहणार नाही. तथापी, या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!