Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Police: आता निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police: आता निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune News: कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. निलेश घायवळ हा परदेशात पळून गेल्यानंतर राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. नवनव्या घडामोडीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पुणे पोलिसांनी आता निलेश घायवळच्या भोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला आहे. निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला देखील पुणे पोलिसांनी रडारवर घेतल आहे. सचिन घायवळवर मोक्का लावण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करत आहेत.

कोथरुडमधील घराची दोनदा छापेमारी केल्यानंतर आता घायवळप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी(ता.10) कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी मोठे आदेश दिले आहेत. घायवळ प्रकरण हे आता पुणे पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे आता निलेश घायवळ प्रकरणाचा तपास चांगलाच वेग पकडण्याची शक्यता असून यात धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर घायवळची 10 बँक खातीही गोठावली होती.तसेच त्याला पासपोर्ट मिळवून देणाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे. लूक आऊट नोटीस देखील त्याच्याविरोधात बजावण्यात आली आहे.आणि पुन्हा त्याच्या घरावर छापेमारी करत जमिनीसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत.

कुख्यात गुंड घायवळ बंधूच्याकारवाया’मुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. गुंड निलेशचा सख्खा भाऊ सचिन घायवळ हा सध्या पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. सचिन घायवळ याला शस्त्र परवाना कुणाच्या आशीवार्दानं मिळाला, यावरुन सध्या पोलिस आणि राजकारणात ‘ती’ व्यक्ती कोण आहे,याचा तपास सुरु आहे. संशयांची सुई कुणाकडे जाणार हे लवकरच समजेल.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!