Manoj Jarange Patil On Vijay Wadettiwar: काँग्रेसच्या नेत्यावर मराठा समाजातील आंदोलक मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार छगन भुजबळांच्या आहिरी गेले आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. जो नेता छगन भुजबळच्या प्रभावाखाली जातो, तो आपली राजकीय कारकिर्दीत टिकू शकत नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, विजय वडेट्टीवार छगन भुजबळ यांच्या राजकीय षडयंत्रात सामील झाले आहेत. वडेट्टीवार सुरुवातीला चांगले नेता आणि सक्षम विरोधी पक्षाचे नेते होते, परंतु आता ते काँग्रेसमध्ये बदल घडवण्यासाठी निघाले आहेत. काँग्रेसचा महामोर्चा किंवा मोर्चा कितपत प्रभावी ठरला? असा सवालही यावेळी जरांगेंनी केला.
वडेट्टीवारांनी मराठा समाजासाठी 48 टक्के आरक्षण मिळवण्याचा उल्लेख केल्याबद्दल जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. जरांगे पाटील म्हणाले की, ‘ते आता प्युअर येडं झालं आहे. त्याला हे दिसत नाही कितीतरी जाती ओबीसी मध्ये आल्या त्यांच्या जागा कमी झाल्या. जो समाज मागासवर्गीय आयोगाची निकष पूर्ण करत नाही तो समाज सुद्धा त्यांना ओबीसी मध्ये चालतो. त्यांना दुखणं आणि द्वेष फक्त मराठा समाजाचा आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा – Radhakrishna Vikhe: विखे पाटील अंतरवाली सराटीत दाखल; जरांगे पाटलांची घेतली भेट, दोघांमध्ये चर्चा
तुला ओबीसीचा एवढा पुळका येतो? एवढी माया येते इथून मागे मोर्चा काढायचा ना मग अशी टीकाही जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली. तथापी, मनोज जरांगे पाटील यांनी पुढे म्हटलं की, विजय वडेट्टीवार हे छगन भुजबळच्या प्रभावाखाली गेलेले नेते आहेत. परळीमध्ये लाभार्थी टोळी तयार झाली आहे आणि वडेट्टीवार त्या गटाशी निगडीत आहेत. छगन भुजबळच्या आहारी गेलेल्या नेत्यांमध्ये ते एक आहेत, असंही जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
या वक्तव्यांमुळे ठाणे आणि परिसरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दरम्यान, आता मराठा समाजाच्या नेत्यांकडून काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांवर केलेली टीका आणि आरोप लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.


