Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर; वगळलेल्या बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष

राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर; वगळलेल्या बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष

पुणे: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतापिक सगळ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी लावून धरली होती. त्यावर सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. त्यानंतर आज गुरूवारी बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या शसन आदेशात शेती, पिकं, जमीन, पशुधन आणि घरांसह विविध नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त केवल हेक्टरी १० हजार रुपये अधिकची मदत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि पुराने शेतीचं आतोनात नुकसान झालं आहे. बीड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, सोलापूर तसचे राज्यातील अनेक भागात पूर आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील ३१ जिल्ह्यातील २५३ तालुक्यांना अतिवृष्टी व पूर बाधित शतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी

विदर्भ विभाग

यवतमाळ: वणी, झरी-जामनी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव

वाशीम: कारंजा, मानोरा, वाशीम

अमरावती: धारणी, मोर्शी, चांदूरबाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर

बुलढाणा: मलकापूर, सिंदखेडराजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगावराजा, चिखली, मोताळा, खामगाव

अकोला: अकोट, बालापूर, पातूर, तेल्हारा, माशीटाकळी

नागपूर: सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर, नरखेड

वर्धा: समुद्रपूर, वर्धा, आर्वी, सेलू, देवळी, कारंजा घाट, हिंगणघाट

चंद्रपूर: सिरोंचा, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, ताडाळा, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिपरी, पोभूर्णा, ब्रह्मपुरी

भंडारा: भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी

गोंदिया: गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरगाव-अर्जुनी, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी

गडचिरोली: गडचिरोली, वडसा (देशगाव), कुरखेडा, कोरची, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा

मराठवाडा विभाग

उस्मानाबाद: उमरगा, उस्मानाबाद, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी, तुळजापूर

लातूर: देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ, उदगीर, चाकूर

परभणी: परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, मानवत, सोनपेठ, पूर्णा, जिंतूर

हिंगोली: कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ

छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री

जालना: अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मांठा, भोकरदन, जाफ्राबाद

बीड: बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, अंबाजोगाई, परळी, वडवणी, केज

 

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर: दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा

अहमदनगर: कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहमदनगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर

पुणे: हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड

सातारा: कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर

सांगली: तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडी, जत, सांगली, इस्लामपूर, वाळवा

कोल्हापूर: गगनबावडा, चांदगड, पन्हाळा

कोकण विभाग

रायगड: माणगाव, सुधागड (पाली), म्हसळा, अलिबाग, पेण, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन

रत्नागिरी: दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, संगमेश्वर, रत्नागिरी

ठाणे: मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण

पालघर: पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा

उत्तर महाराष्ट्र

नाशिक: मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, सिन्नर, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, बागलाण, चांदवड, येवला

जळगाव: मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावेर

नंदुरबार: शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी

 

राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान होऊनही मदतीच्या यादीतून जिल्हा वगळला आहे. तसेच विविध जिल्ह्यातील बाधित तालुके वगळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप रोष निर्माण झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!