Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजकारणापलीकडची मैत्री..! पुण्यात तीन वर्गमित्रांची मैत्रीपूर्ण लढत चर्चेत; आज मतदान, उद्या निकाल

राजकारणापलीकडची मैत्री..! पुण्यात तीन वर्गमित्रांची मैत्रीपूर्ण लढत चर्चेत; आज मतदान, उद्या निकाल

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि दौंड या नगरपरिषदांच्या काही प्रभागांसह इतर ठिकाणी आज (२० डिसेंबर २०२५) मतदान होत आहे. फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्साह आहे. राज्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुका न्यायालयीन प्रकरणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याने आज २३ ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. उद्या (२१ डिसेंबर) सर्व ठिकाणच्या निकालांची एकत्रित मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेत ३२ जागांसाठी १२० उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बारामतीत ४१ जागांसाठी १५५ उमेदवार, तर अध्यक्षपदासाठी १४ उमेदवार आहेत. दौंडमध्ये एका प्रभागाची, लोणावळ्यात दोन आणि तळेगाव दाभाडेत पाच जागांसाठी मतदान होत आहे. सर्व मतदान केंद्रांवर दीड हजार अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत, तसेच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तीन वर्गमित्रांची मैत्रीपूर्ण लढत चर्चेचा विषय

फुरसुंगी-उरुळी देवाचीतील प्रभाग क्रमांक १ मधून तीन शालेय वर्गमित्र वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपचे विराज करचे (इंजिनिअर), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गिरीष ढोरे (वकील) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे प्रकाश भारती (उद्योजक) अशी या तिघांची नावे आहेत. तिघांची मैत्री राजकारणापलीकडची असून, निवडणुकीतही खेळीमेळीने लढत देत आहेत. ही मैत्रीपूर्ण कुस्ती कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रचार काल रात्री १० वाजता थांबला असून, आता मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने पडतो, हे उद्या स्पष्ट होईल. फुरसुंगी-उरुळी देवाचीसह इतर ठिकाणच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये थेट लढत आहे. पहिल्या नगरपरिषद निवडणुकीमुळे या भागाच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!